sainikmaha

This Website fature As A View GR, Add Member Of ReGOVERNMENT RE-EMPLOYMENT EX-SERVICEMAN in Website

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्यात शासन सेवेत असलेल्या माजी सैनिकांच्या अडचणी ह्या विविध स्वरुपाच्या असल्यामुळे व विशेषता सैन्यदलातील सेवेच्या नियमाच्या संबधित असल्यामुळे राज्यात कार्यरत असलेल्या विविध संघटनेंना याबाबतचचे ज्ञान नसल्यामुळे या अडचणी मध्ये वाढ होत होती . त्यामुळे शासन सेवेत असलेल्या माजी सैनिकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. या अडचणीत वर्ष 2011 मध्ये अधिक वाढ झाली , राज्यातील शासन सेवेत असलेल्या माजी सैनिकांना विशेषतः जानेवारी 2006 नंतर शासन सेवेत नियुक्त झाले . त्यांच्या करिता सदर वर्ष फार वेदनादायी व असह्य वाटणारे ठरले .